अण्णाभाऊ म्हणजे साहित्यातील विचारांचे विद्यापीठ : संदिप मानकर

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : ज्यांनी वंचित, शोषित, उपेक्षित आणि पीडितांच्या भावनांना आपल्या लेखणीतून वाचा फोडली असे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्त्व साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त अजिंठा येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सभागृहात अण्णाभाऊंची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यांत आली. 

अण्णाभाऊंचे विपूल साहित्य अन साहित्य क्षेत्रांतील त्यांची अजरामर असलेली कीर्ती म्हणजेच अण्णाभाऊ हे साहित्यातील विचारांचे विद्यापीठ होते असे प्रतिपादन क्रांतीगुरु लहुजी साळवे विकास परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष संदिप मानकर यांनी बोलताना केले.

अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक पी. व्ही. सोने सोन्ने तर प्रमुख पाहुणे म्हणून अजिंठा पोलीस ठाण्याचे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन इंगळे, महात्मा ज्योतिबा महाविद्यालयाचे प्राचार्य देशमुख, अनंत बुलबुले, समाधान लोखंडे आदींची उपस्थिती होती.

याप्रसंगी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संतोष काकडे, मार्गदर्शक राजु पवार, मोहन मिसाळ, देविदास सातफळे, यशवंता कसारे, विजय बावस्कर, साहेबराव काकफळे, किशोर सातफळे, लोकेश पवार, राजु सातफळे, ऋषिकेश पवार, दिपक सातफळे, सागर पाचवणे, अरुण सातफळे, संदिप लोखंडे, रवी बहिलम, ज्ञानेश्वर सातफळे, संतोष कसारे, दिनेश सातफळे, योगेश सातफळे, विशाल अवसरमोल, अर्जुन सातफळे, मंगल खरात, लक्ष्मण जाधव, देवा जाधव, करण सातफळे, विशाल बावस्कर, गजानन मानकर, विजय कसारे, श्रीकांत मानकर, रविंद्र मानकर, प्रदिप मानकर, संतोष चव्हाण, चंद्रकलाबाई सातफळे, दुर्गाबाई सातफळे, छायाबाई पवार, रेणुकाबाई सातफळे, छायाबाई काकडे, उषाबाई कांबळे, दुर्गाबाई काकफळे, सरुबाई सातफळे, ज्योतीबाई जाधव आदींसहित समाजबांधव व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर सातफळे यांनी केले, गीतगायन गजानन मानकर यांनी तर आभार समाधान लोखंडे यांनी मानले.